सध्या अनेक भागात विविध उपक्रम राबविले जात आहेत. जेणेकरून विकासकामांमध्ये कोत्याही प्रकारची अडसर ठरणार नाही. सांगोला नगरपालिकेकडून अशीच एक मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०२४- २५ अखेर १५ हजार ८४५ खुली जागा, गाळेधारक व मालमत्ता धारकांकडून थकबाकी वसुलीमध्ये एकूण ६ कोटी १२ लाख २७ हजार उद्दिष्टा पैकी आज अखेर कोटी २८ लाख ०७ हजार रुपये वसुली केली आहे. उर्वरित कोटी ८४ लाख २० हजार रुपये थकबाकी वसुलीसाठी सांगोला नगरपालिकेकडून ६ वसुली पथकाच्या माध्यमातून वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे.
यासाठी थकबाकीदार इमारत व गाळे तसेच खुल्या जागेधारकांना नगरपालिकडून नोटीस बजविण्यात आले आहेत. दरम्यान मुदतीमध्ये कर भरणा केला नाही तर नळ कनेक्शन तोडणे, मालमत्ता धारकांची नावे प्रसिद्ध करणे व जप्तीची कारवाई केली जाणार असून, थकबाकीदारांनी वेळेत आपली थकबाकी भरून नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांनी केले आहे.