संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून शहरातील काळ्या ओढ्याची स्वच्छता सुरू केली आहे.
सन २०१९ आणि सन २०२१ साली पंचगंगा नदीस आलेल्या महापुराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, महापालिका विभाग प्रमुख तसेच पुर शहराच्या नागरी वस्तीमधून वाहणारा काळा ओढा सातत्याने प्लास्टीक, कचऱ्याने भरलेला असतो. त्यामुळे नागरीवस्तीमध्ये दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येते. तेव्हा महानगरपालिका प्रशासनाने या काळ्या ओढ्याच्या स्वच्छतेसाठी कायम स्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
क्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समवेत शहरातील पुर क्षेत्राची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान शहरातील काळ्या ओढ्याची पाहणी केले नंतर आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी पावसाळ्या पुर्वी तातडीने काळ्या ओढ्याची स्वच्छता करणेचे आदेश आरोग्य विभागास दिले होते. या आदेशा नुसार आरोग्य विभागाकडून जे. सी. पी. च्या सहाय्याने काळ्या ओढ्याची स्वच्छता आणि रुंदीकरणाचे काम सुरू करणेत आलेले असुन पावसाळ्या पुर्वी काळा ओढ्याची स्वच्छता करणेत येणार आहे.