दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भालेवाडी (ता.मंगळवेढा) येथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.यातील चार जणांना ताब्यात घेतले असून उर्वरित पाच जण पळून जाण्यात यशस्वी झाले.बुधवारी पहाटे हा प्रकार घडला.
याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आदम बशीर मुलाणी (मुळेगांव रोड सोलापूर), शब्बीर खाजीमीन शेख (सोलापूर), धनराज राम आठवले (सोलापूर), संतोष यल्लाप्पा वाघमारे ( सोलापूर) यांना अटक करण्यात आली असून बुडन मुजावर (रा. शेळगी सोलापूर), नुर पठाण (रा. सोलापूर पुर्ण नांव व पत्ता माहित नाही) व गणेश (रा.सोलापूर) आदी फरार झाले.
बुधवारी पहाटे पावणे पाच वाजता गस्तीवर असलेल्या पोलिसांना भालेवाडीतील एका तरुणाने फोन करुन आम्ही गावकऱ्यांनी गावात ४ चोरट्याना पकडले असूनत्यांच्याकडे एक मोटार सायकल व एक अशोक लेलंड कंपनीचे चार चाकी वाहन मिळाले असून उर्वरित ५ ते ६ इसम हे दोन कारमधून पळून गेल्याचे सांगितले.
पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.नितीन गवळी, आबा गवळी, भालेवाडी गावचे पोलिस पाटील शशांक मनोहर गवळी, सरपंच श्रीकांत एकनाथ दवले, सचिन शिवशरण व इतर सुमारे १०० ते १५० लोक हजर होते व त्यांनी चार इसमाना ताब्यात घेवून ठेवले होते.
त्यावेळी चोरट्याकडील वाहन एम. एच १३ ए.एन ६७०१ व मोटार सायकल एम. एच १३ बी.डब्ल्यु ११६४ ची तपासणी केली असता दरोडयाचे साहित्य,लोखंडाची एका हातात मावेल एवढ्या आकाराची सळई, लोखंडी कटावणी, – एक हिरवे रंगाची मुठ असलेले मार्टेल एका कागदी पुड्यात लाल चटणी आदी दरोड्याचे साहित्य मिळून आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत.