वाळव्यातील पंचकल्याण पूजेच्या तयारीची भट्टारक पट्टाचार्य महास्वामींकडून पहाणी

वाळवा येथे अनेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील मिळतो. वाळवा कोटभाग येथे १४ फेब्रुवारी पासून सुरु होत असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव व विश्वशांती महायाग उत्सवाच्या पूर्वतयारीची अंतीम टप्प्यातील पहाणी करण्यासाठी नांदणी मठाचे मुनी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी भेट दिली. समस्त जैन श्रावक-श्राविकांनी मुनींची पाद्यपूजा केली. मंडपाची पाहणी करून मुनीश्री मंदिरात आल्यानंतर कोटभाग जीन मंदिरात प्रतिष्ठापित केलेल्या भगवंत प्रतिमेवरील मानस्तंभावरील प्रशस्ती वाचून नांदणीमठ व कोटभाग जिनमंदिर बस्ती यांच्यातील अतूट  नाते व श्रद्धा याबद्दल सविस्तर माहिती दिली.