दुष्काळी भाग म्हणून सांगोला तालुका प्रसिद्धीस आहे. या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते तसेच पाण्यासाठी नागरिकांची वणवण देखील सूरु असते. पाणी टंचाई दूर करण्यासाठी सरकार तर्फे प्रयत्न देखील केले जात आहेत. सध्या वातावरणात दिवसेंदिवस फरक पहायला मिळत आहेत. कधी ऊन तर कधी थंडी अनुभवायला मिळत आहे. सध्या तालुक्यात उसाचे पीक क्षेत्रात मोठी वाढ झाल्याने या ऊस पिकाला उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निश्चितपणे जाणवणार आहे.
सांगोला तालुक्यात सध्या हिवाळ्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विहिरी व विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीबरोबरच बंधाऱ्यातील पाणीही कमी होऊ लागली आहे. तालुक्यातील १८ बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १२७०.२७ दलघफु असताना आजमितीला या बंधाऱ्यात केवळ ९७.२९ (७.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. ऐन उन्हाळ्यात तालुक्यात पिकांना पाणीटंचाईचे संकट जाणवणार आहे. सांगोला तालुका हा पर्जन्यछायेचा प्रदेश मानला जातो. हा परिसरात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई नेहमी जाणवू लागते.
सध्या उन्हाची तीव्रता जाणवू लागल्यामुळे विहिरी व विंधन विहिरींचे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. तालुक्यातील माण व कोरडा नदीवरील बंधाऱ्यासह पाच तलावातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. या दोन्ही नद्यावरील १८ बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता १२७०.२७ दलघफु असताना आजमितीला या बंधाऱ्यात केवळ ९७.२९ (७.३१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. अचकदानी तलावासह खवासपूर, लोटेवाडी, बलवडी, अनकढाळ, मेडशिंगी बंधारे कोरडे ठणठणीत पडले असल्याने शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता म्हैसाळ व टेंभूच्या आवर्तनाकडे लागल्या आहेत.
सद्यस्थितीला १८ पैकी १० बंधाऱ्यात एक महिना पुरेल इतका पाणीसाठा बंधाऱ्यात उपलब्ध आहे. तर इतर आठ बंधारे कोरडे पडले आहेत. त्यामुळे मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याने शेतकऱ्यांचे म्हैसाळ, टेंभू सिंचन योजनेतून आवर्तन कधी सोडले जाणार याकडे लक्ष लागले आहे.