अनेक भागात काही ना काही कारणांसाठी तसेच अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलने केली जातात. यावर अनेक तोडगे देखील निघतात. हातकणंगले येथील एका शिक्षण संस्थेला नरंदे ग्रामस्थांचा सि.स.नं. २१८ मधील भाडेपट्टा मुदतवाढ व वॉल कपाऊड करण्यास ग्रामसभेत विरोध नोंदवला असतानाही ग्रामपंचायत व ग्रामसभेला विश्वासात न घेता पुढील ३० वर्षे भाडेपट्टा मुदत वाढ तात्कालीन जिल्हाधिकारी यांनी कोरोना कालावधीत भाडेपट्टा मुदतवाढ दिली याच्या निषेधार्थं २६ जानेवारी रोजी सामुदायीक आत्मदहन करण्याचा इशारा नरंदे ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले देत असताना ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांना आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भिंत पाडल्याच्या कारणावरुन गावात मोठा तणाव झाला होता. गावबंद ठेवण्यात आले होते. परस्परविरोधी तक्रारी झाल्या होत्या. या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन आ, डॉ. अशोकराव माने यांनी ग्रामस्थांना दिले होते. परंतु त्यानंतर काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश विश्वासात न घेता आमचे तक्रारी अर्ज निकालात काढून नरंदे ग्रामस्थांवर अन्याय झालेला आहे. सदरची बाब न्यायप्रविष्ठ असलेने हायकोर्ट मध्ये याचिका दाखल केली आहे. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर विद्यमान संरपच पूजा कुरणे, माजी सरपंच स्वी अनुसे, माजी सभापती राजू भोसले, शरद कारखाना संचालक अभिजीत भंडारी, बाळासो भंडारी सीमा भंडारी यांच्या निवेदनावर सह्या आहेत.