महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) आंदोलनाला यश विनोद भाई बाबर सांगोला नगरपालिकेने भुयारी गटार योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी खोदकाम केलेले आहे. सादर गटारीचे काम साधारण एक वर्षांपासून चालू आहे संबंधित ठेकेदारांनी खोदकाम झाल्यानंतर सदरच्या रस्ता व्यवस्थित उपयुक्त करून देणे अपेक्षित होते. परंतु शहरातील जवळजवळ सर्वच भागांमध्ये असे आढळून आले नाही त्यामुळे शहरातील येणाऱ्या नागरिकांना त्याचा भयानक त्रास सहन करावा लागत होता हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लक्षात आल्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष विनोद भाई बाबर यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला व तसे निवेदन सांगोला नगरपालिका मुख्यधिकारी श्री गवळी साहेब यांना दिले सदर निवेदनाची दाखल घेऊन मुख्यधिकारी यांनी तात्काळ सदर ठेकेदारास सांगोला शहरातील सर्व रस्ते किमान रहदारीस उपयुक्त व्हावेत तसे दुरुस्त करून घ्यावे अशा प्रकारचा आदेश दिला सदर आदेशाप्रमाणे आजपासून काम चालू झाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे कित्येक दिवस नादुरुस्त असलेले रस्ते आज किमान रहदारीस उपयुक्त ठरतील अशा स्वरूपाचे होते आहेत शहरातील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याचे आभार मानले अशी माहिती मनसे उपाध्यक्ष विनोद बाबर यांनी दिली .
