कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अनेक नवनवीन कार्यक्रम, उपक्रम राबविले जातात. यामध्ये मग शैक्षणिक असो व धार्मिक नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर पहायला मिळतो. हातकणंगले तालुक्यातील रुकडी या आचार्य रत्न १०८ बाहुबलीजी महाराज यांच्या जन्मगावी अष्टापद तीर्थ हे क्षेत्र प्रथम गणिनी प्रमुख आर्यका १०५ मुक्ती लक्ष्मी माताजी यांच्या प्रेरणेने निर्माण होत आहे.
या क्षेत्रावरती १९ जानेवारी ते २५ जानेवारी अखेर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यासाठी सोहळ्याचे स्वागत अध्यक्ष खास. धैर्यशील माने व आम. अशोक बापू माने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निमंत्रण दिले असून दोघांनीही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. मुंबईतील त्यांच्या कार्यालयात श्रावक किरण पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना रितसर निमंत्रण दिले असून दोघांनीही सोहळ्यास येणार असल्याचे सांगितले. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील पंचकल्याण महोत्सवास शिंदे उपस्थितीत राहणार आहेत.