हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील उद्धव ठाकरे गटाचे माजी शिवसेना शहरप्रमुख निवास माने व जनसुराज्य शक्ती पक्षाचे वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांची झालेली युती एक उल्लेखनीय ठरत आहे. परिणामी निवास माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शहर प्रमुख पदाचा राजीनामा देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे काम कुंभोज येथे अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून चालू केले. त्यासाठी त्यांना माजी जिल्हाप्रमुख व गोकुळ दूध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांचे सहकार्य लाभले.
परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडल्यानंतर निवास माने यांनी ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे काम करण्यास सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीत वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून धैर्यशील यांच्या विजयासाठी कुंभोज तसेच परिसरामध्ये आपल्या सहकाऱ्यांसह काम करण्यास सुरुवात केली आणि त्यात यश देखील मिळाले.
विधानसभेच्या निवडणुकीत कुंभोज येथे जनसुराज्य एकनाथ शिंदे गट भाजप व अन्य मित्र पक्षांनी एकत्र मिळून डॉ. अशोक माने यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान केले व त्यात अशोक माने यांना कुंभोज सह परिसरात मोठे मताधिक्य मिळाले. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते व जनसुराज्य पक्षाची झालेली झालेली ही युती येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नक्कीच फायदेशीर ठरणार असून येणाऱ्या काळात ही युती अशीच रहावी असे अनेक जाणकारांचे मत व्यक्त होत आहे.