लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशी इच्छुक आणि विद्यमान खासदारांनी लोकसभा मतदारसंघात आणलेल्या निधींचे बॅनर झळकवण्यास सुरुवात केली आहे.
खासदार धैर्यशील मानेंनी मतदारसंघात अनेक ठिकाणी निधी खेचून आणल्याचे बॅनर लावले आहेत.त्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांकडून विकासकामांबद्दल मतदारसंघात प्रचार सुरू आहे.हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देणारे बॅनर लावले आहेत.
बॅनरवर विकासकामं आणि निधीची माहिती जाणून घेण्यासाठी क्यू आर कोड देण्यात आला आहे. तो फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.मतदारसंघातील काही तरुणांनी बॅनरवर लावलेला क्यू आर कोड स्कॅन केला. मात्र, त्यानंतर वेगळंच संकेतस्थळ उघडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अशातच मतदारसंघातील विकासकामांची माहिती देण्यासाठी बॅनरवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे.
पण, हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर बिटकॉइन आणि शेअर मार्केटचे संकेतस्थळ ओपन होत आहेतयानंतर धैर्यशील मानेंना ( Dhairyashil Mane ) सोशल मीडियात ट्रोल केलं जात आहे.