हुतात्मा कारखान्यास पुरस्कार जाहीर, ३० जानेवारीला नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान 

सरकारतर्फे अनेक पुरस्कार प्रदान केले जातात. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्यास चिनी मंडी या संस्थेच्यावतीने देण्यात येणारा ‘मोस्ट ट्रस्टेड को. ऑपरेटिव्ह शुगर मिल’ हा पुरस्कार जाहिर झाला असून गुरुवार ३० जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राम पाटील यांनी दिली. पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांचा कामगारांचे वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी श्री. पाटील पुढे म्हणाले, गेल्या ४० वर्षात चांगला साखर उतारा मिळवून उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखली आहे.

साखर कारखानदारीत हुतात्मा कारखान्याने शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस दर देण्याचा पायंडा पाडला आहे. कारखान्याचे कामकाज दुरदृष्टीने, काटकसरीने उत्कृष्ठ व्यवस्थापन राबवून कारखानदारीत ‘हुतात्मा पॅटर्न’ नावारुपाला आला. यावेळी कारखान्याचे तांत्रिक सल्लागार उमाजी पाटील, मुकेश पवार, बाबासो माने, काशिनाथ शेटे, एन. डी. पाटील, अजित माळी, एस. ए. पाटील, संजय गायकवाड, हनुमंत सुर्यवंशी, ओंकार खोत, बाजीराव मांगलेकर आदी पस्थित होते.