अंबप (ता. हातकणंगले) येथे अवैद्य दारूची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अनेकवेळा याबाबत तक्रारी झाल्या होत्या. ग्रामसभेने अवैद्य दारू विक्री व्यवसायाच्या विरुद्ध ठराव केले होते. तरीही हा व्यवसाय सुरू होता. अंबपमध्ये दोन ठिकाणी अवैद्य दारू विक्री व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आले आहे.सोमवारी दुपारी पेठवडगाव पोलिसांनी अंबप येथील मातंग वसाहत व धनगर गल्ली येथे अचानक छापा टाकला. यावेळी संशयित सतीश दाभाडे व कोंडीबा वाघमोडे यांच्याजवळ अवैद्य दारू विक्रीसाठी ठेवलेली सापडली. यामध्ये रोख रक्कम व दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त करत मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले आहे.