उद्यापासून पंचगंगा वरदविनायक मंदिरात सामुदाईक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

इचलकरंजी शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात त्याचबरोबर अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील पहायला मिळतो. इचलकरंजी येथील श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीने गणेश जयंती निमित्त उद्या २५ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांसह सामुदाईक ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्या शनिवार २५ जानेवारी रोजी नदीतीरावरील गणेश मंदिरात सकाळी ८.१५ वाजता उत्सव मूर्तीचे पुजन, दीपप्रज्वलन आणि श्री ज्ञानेश्वरी पारायणाचा शुभारंभ माजी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्या हस्ते व बाळासो जांभळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळाचे सेक्रेटरी द्वारकाधिश सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

तर सामुदाईक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हभप सदाशिव उपासे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. तर दररोज सकाळी ८.१५ वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण व दुपारी ४ ते ७ या वेळेत भजन होणार आहे. यामध्ये श्री महालक्ष्मी महिला भजनी मंडळ, श्री बाळ अवधुत भजनी मंडळ, श्री दत्त भजनी मंडळ, श्री सिध्दीविनायक भजनी मंडळ, श्री तुळजाभवानी म भजनी मंडळ यांचा समावेश आहे शनिवार १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता श्रींची सहस्त्रावर्तने, १० ते १ मारवाडी युवा मंच मिटटाऊनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर, १०.१५ वाजता सौ. राधिका कालेकर यांचे गणेश जन्माचे किर्तन, दुपारी १२.०५ वाजता श्रींचा जन्मकाळ व प्रसाद वाटप, सायंकाळी ५ वाजता श्री सप्तश्रृंगी महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ६.३० वाजता दीपोत्सव व ७ वाजता महाआरती होईल.

तर रविवार २ फेब्रुवारी रोजी ८.३० वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायण व सप्ताह सांगता सोहळा आणि ११ वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे. या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष तथा राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी व उत्सव समितीचे अध्यक्ष पंडीत काजवे यांनी केले.