महायुतीच्या उमेदवारीत वाढणार गुंता! हळवणकरांच्या भूमीकेकडे लक्ष

काही दिवसांपासून राहुल आवाडे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू होती. त्यावर स्वतः प्रकाश आवाडे यांनी अखेर शिक्कामोर्तब केले. त्यांना महायुतीकडून राहुल यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा आहे. इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून आमदार प्रकाश आवाडे यांच्याऐवजी आता राहुल आवाडे उमेदवार असणार आहेत.

त्यांनी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, त्यांच्या उमेदवारीवर महायुतीकडून शिक्कामोर्तब होणार काय, याकडेही लक्ष आहे. आवाडे यांच्या या निर्णयामुळे महायुतीकडून उमेदवारी निश्चित करताना आता गुंता वाढणार आहे.

विशेषतः महायुतीकडून प्रबळ दावेदार असलेल्या सुरेश हाळवणकर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यातून मार्ग काढताना महायुतीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. महायुतीकडून राहुल यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असली तरी
मात्र, ही जागा भाजपकडे (BJP) असल्यामुळे उमेदवारीचा गुंता संपलेला नाही.

हा गुंता संपविण्यासाठी गतवेळचे भाजपचे उमेदवार सुरेश हाळवणकर यांना विधानपरिषदेचा पर्याय दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र पक्षाने उमेदवारी दिल्यास निवडणूक लढविण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.