सध्या अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येते. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे प्रास्तावित क्रीडा संकुलासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. काल सकाळी वडगाव पालिका चौकात शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आंदोलनाला माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ, निमंत्रक विजय अपरात ,माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, वारणा कारखान्याचे संचालक सुभाष जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यासह परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे प्रास्तावित क्रीडा संकुलासाठी मागणी करण्यात येत असलेल्या जागेबाबत ठोस निर्णय घेण्याच्या मागणीसाठी पंचक्रोशी क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजीव आवळे व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी आंदोलन स्थळी जाऊन चर्चा करून क्रीडा संकुलासाठी कोल्हापूर रोड लगतची जमीन पंधरा दिवसात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले. तसेच आम. माने यांनी क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सकारात्मक चर्चा नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.