२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे शहरवासीयांना आवाहन…..

प्रजासत्ताक दिन काल संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. अनेक भाषणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेण्यात आले. इचलकरंजी शहरात देखील मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. लोकप्रिय खासदार धैर्यशील दादा माने जनसंपर्क कार्यालय इचलकरंजी येथे ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोल्हापुर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री रविंद्र माने साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्रगीत व राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या व शहरातल्या घराघरात फडकू दे भगवा शिवसैनिक नोंदणी करुन ‘शिवकार्य’ जागवा असा नारा देत इचलकरंजी शहरातील शिवकार्य सदस्य नोंदणी जास्तीत जास्त करावी असे आवाहन केले.

याप्रसंगी अध्यक्ष मा.‌काकासो माने, मेमोरियल ट्रस्ट श्री अमरसिंह माने साहेब, इचलकरंजी शिवसेना शहरप्रमुख श्री. भाऊसाहेब आवळे सर, मा. उपनगराध्यक्ष, श्री. रवि साहेब रजपुते, मा. नगरसेवक श्री. महादेव गौड साहेब, अध्यक्ष इं.ट.क श्री. शिवाजी जगताप साहेब, मा. नगरसेवक, श्री. प्रकाश पाटील साहेब, मा. नगरसेवक, श्री. रविंद्र लोहार साहेब, कोल्हापुर शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. वैशालीताई डोंगरे,

इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ. रुपालीताई चव्हाण, इचलकरंजी शिवसेना महिला आघाडी शहरप्रमुख सौ. स्नेहांकिताताई भंडारे, इचलकरंजी शिवसेना उपशहरप्रमुख श्री. सुशील खैरमोडे दादा, कोल्हापुर शिवसेना जिल्हा संघटक
श्री. मोहनदादा मालवणकर, युवासेना इचलकरंजी विधानसभा प्रमुख श्री. ऋषी गौड, वाहतूक सेना शहरप्रमुख श्री. विठ्ठल काकणगी साहेब तसेच इतर मान्यवर, इंटकचे संचालक, पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.