शेतकऱ्यांना चार पट भरपाई मिळण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

सध्या प्रत्येक भागात नागरिकांच्या अनेक समस्ये बाबतीत योग्य ते निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेवर महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.

या बैठकीत शेतकऱ्यांना मागील प्रक्रियेनुसार चार पट भरपाई मिळावी यासाठी NHAI च्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना न्याय मोबदला मिळावा यासाठी शासन स्तरावर ठोस प्रयत्न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.