हुपरीतील सिद्धार्थनगर परिसरातील रहिवाशांनी सुरु केले ओढ्यावरच आमरण उपोषण…

सध्या प्रत्येक भागात काही ना काही अडचणी या आहेतच. त्या अडचणी, ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न देखील होतात पण काही वेळा या प्रश्नाकडे दुर्लक्षित देखील केले जाते. अलीकडे पाणी प्रदूषण हा एक महत्वाचा मुद्दा आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत खूपच अडचणींचा सामना करावा लागतो. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथे सिद्धार्थ नगर मधील ओढ्याचं बांधकाम सुरू आहे. शहरातील काही भागासह औद्योगिक वसाहती मधील केमिकल युक्त पाणी या ओढ्यातून वाहते.

मात्र या बांधकामामुळे ओढ्याचं अरुंद होऊन पावसाळ्यात ओढ्यातील पाणी सिद्धार्थनगर परिसरातील वसाहतीमध्ये शिरण्याचा धोका आहे. हे बांधकाम थांबवण्याबाबत हुपरी नगर परिषदेकडे वारंवार निवेदन देऊनही कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या रणजीत कांबळे, अविनाश कांबळे हसरत कांबळे, किशोर कांबळे ,राहुल कांबळे आदींनी बांधकाम थांबवण्याच्या मागणीसाठी ओढ्यावरच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.