शासनाकडून अनेक नवनवीन योजना सध्या राबविल्या जात आहेत. जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा पुरेपूर लाभ होईल. इचलकरंजी शहरात या शासनाकडून राबविल्या जात असलेल्या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेला होण्यासाठी पुरेपूर प्रयत्नशील राहतात. आज भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे पात्र पेन्शनधारकांना मंजूरी पत्र वाटपाचा कार्यक्रम भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमास संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष अनिल डाळ्या, सदस्य संजय नागुरे, कोंडीबा दवडते, केडीसी बँकेचे कर्मचारी राजू लायकर, जेष्ठ नेते मिश्रीलाल जाजु यांच्यासह पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र पेन्शनधारकांना मंजूरी पत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न
