सध्या महागाई इतकी वाढली आहे कि त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. प्रत्येक दरात खूपच वाढ होत असल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. सध्या एस. टी.भाडे देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. बावड्यात शांतता असली तरी हातकणंगलेतील ठाकरे सेनेने एस. टी. भाडेवाढीच्या विरोधात आज मंगळवारी हातकणंगलेत चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सेना आक्रमक झाल्याने सरकार पक्षाची कोंडी वाढणार आहे. दरम्यान, संजय चौगुले यांनी प्रवाशांच्या खिशावरील दरोडा सहन करुन घेणार नाही, असे दरडावले.
आज हातकणंगलेत एस.टी. भाडेवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय
