वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथे मंदिर विकास कामास प्रारंभ

सध्या अनेक भागात विकासकामांचा धडाका सुरु आहे. खूप सारे निधी देखील मंजूर केले जात आहेत. त्यामुळे गावागावात विकास सुरु होण्यास मदत होऊ लागली आहे. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील  मंदिराच्या विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. यावेळी येथील श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन देवस्थान येथे संरक्षक तटभिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ नूतन आमदार सत्यजित शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. या कामासाठी त्यांच्याकडून ३० लाख रुपये निधी मंजूर करून आणला असून यामधून ४१ फूट संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. यानिमित्ताने अनेक दिवसांची मागणी पूर्णत्वास येत आहे. या बांधकामानंतर मंदिराच्या शोभेत आणखी भर पडणार आहे.

यावेळी पश्चिम मंडल भाजप अध्यक्ष डॉ. सचिन पाटील, अनिल इनामदार, अक्षय पाटील, मलिकार्जुन सेवाभावी मंडळाचे खजिनदार हनमंत पाटील, संभाजी पाटील, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अर्जुन थोरात, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप पाटील, कृष्णा पाटील, अभिजित मदने, भरत शेवाळे, विकास चौगुले, दादासो पाटील, अमृत पाटील, विजयकुमार सावंत, निवास पाटील, अविनाश वायदंडे, मोहन कांबळे, तुकाराम जाधव, धनाजी साळुंखे, प्रकाश जाधव, रवींद्र सुरपूर, विजय पाटील, सागर पाटील, अर्जुन पाटील, पुजारी रवींद्र गुरव, गोरखनाथ गुरव, व पंचक्रोशीतील सर्व भाविकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. भाविकांचे सेवा मंडळाचे अध्यक्ष गोरक्षनाथ गुरव यांनी आभार मानले.