काल पत्रकार दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलेले होते. अनेक पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकारांना पुरस्कार वितरण देखील अनेक भागात करण्यात येते. हातकणंगले येथे महाराष्ट्र पत्रकार संघाच्या नामफलकाचे उद्घाटन व पत्रकार कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. पत्रकार हा समाज व शासन यांचा आरसा आहे. येथील तहसीलदार यांनी पत्रकार कक्षासाठी जागा दिली, ही चांगली गोष्ट आहे. पत्रकारांच्या मुलभूत प्रश्नांसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी आ. डॉ. अशोकराव माने यांनी व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य अरुणराव इंगवले होते. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने मुख्य कार्यक्रमाची सुरवात झाली. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांनी केले. तर पाहुण्याची ओळख तालुकाध्यक्ष पापालाल सनदी यांनी केले. कार्यक्रमास नायब तहसिलदार संजय चव्हाण, बीडीओ शबाना मोकाशी, गट शिक्षणअधिकारी रविंद्र चौगुले, कृषी अधिकारी गडदे, शिंदे नगरसेवक राजू इंगवले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व पाहुण्याचा व ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. आभार पत्रकार दत्तात्रय बिडकर यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष रमेश बोभाटे, तालुकाध्यक्ष राजू शिंदे, विनोद शिंदे, सुकमार आब्दागिरे, सागर जमगे, सल्लागार विनयकुमार पाटील, तोफीक मुजावर याच्यासह तालुक्यातील अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते.