आम. डॉ. राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ५ गावात २६९ घरकुले मंजूर

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. तसेच सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना देखील राबविल्या जात आहेत. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा पुरेपूर लाभ मिळत राहतो. चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी या ५ गावात प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेतून २६९ घरकुले गोरगरीब, कष्टकरी, श्रमिकांच्यासाठी बांधून पूर्ण करुन देण्यासाठी आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी पुढाकार घेतला आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हातकणंगले विभागात जी एकूण घरकुले मंजूर झाली आहेत त्यातील इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील ५ गावात २६९ घरकुले मंजूर करुन घेण्याचे उद्दीष्ट आम. डॉ. राहुल आवाडे यांनी पार पाडून घेतले आहे. चंदूर ५२, कबनूर ५१, खोतवाडी ४७, कोरोची, ६८, तारदाळ ५१ अशा घरकुलांचे प्रस्ताव यात समाविष्ट झाले आहेत. हातकणंगले तालुक्यासाठी २५८३ घरकुले मंजूर झाली आहेत. दरम्यान, आम. डॉ. आवाडे म्हणाले, गरीबांना काही अडचण असल्यास त्यांनी थेट संवाद साधावा, त्यांच्या पाठिशी खंबीर असेन.