अलीकडे सरकार कडून अनेक योजना राबविल्या जातात. त्यांचा लाभ नागरिकांना पुरेपूर मिळतो. त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपट्टी घरपट्टी भरण्याचे वेळोवेळी आवाहन केले जाते पण याला नागरिकांडून दुर्लक्ष देखील बऱ्याच वेळा दिसून येते. वाळवा तालुक्यातील येलूर ग्रामपंचायतच्या वतीने थकीत पाणीपट्टी असणाऱ्यांची नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतच्या वतीने थकीत
पाणीपट्टी असणाऱ्या खातेदारांना वारंवार सूचना देऊन थकीत पाणीपट्टी भरली गेली नसल्याने सदरची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकी भरण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
येलूरमध्ये नळ कनेक्शन बंदची मोहीम, थकबाकी भरण्याचे आवाहन
