मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रतर्फे आयोजित सातव्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी वाळवा तालुक्यातील बहुसंख्य महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या वाळवा तालुका अध्यक्ष मनीषा कुरळपकर यांनी केले आहे. 31 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या दोन दिवसात हरिपूर येथील कृष्णा वारणा नदी संगमावर रॉयल पॅलेस येथे हे अधिवेशन होत आहे.
त्या म्हणाल्या, शिवमती डॉ. अश्विनीताई घोरपडे (पुणे) या अधिवेशनाच्या उद्घाटक आहेत. दुपारी बारा ते एक दरम्यान संविधानातील स्त्री सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान आहे. तिसऱ्या सत्रात दुपारी बदलती विवाहपद्धती आणि सामाजिक भान या विषयावर परिसंवाद होणार आहे. चौथ्या सत्रात समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रातील महिलांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. महिलांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने महिलांनी सहभागी होऊन अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन मनीषा कुरळकर यांनी केले आहे.