अंगात 103 ताप असतानाही पावसात शूट केलं गाणं; माहितीये ही अभिनेत्री नक्की कोण?

बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्यासोबतच आपल्या अभिनयानेही चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यासाठी अभिनेत्रींनी तेवढी मेहनतही घेतली आहे. अशीच एक अभिनेत्री आहे जिने इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. या अभिनेत्रीने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर साउथमध्येही आपली छाप पाडली आहे.ही अभिनेत्री आपल्या अभिनयाबाबत आपल्या कामाबाबत इतकी डेडीकेटेड होती की या अभिनेत्रीने चक्क 103 ताप असतानाही शुटींग पूर्ण केलं.

तिने आपल्या आजारपणातही तिचं काम पूर्ण केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडची ‘हवा हवाई’ म्हणजेच श्रीदेवी.श्रीदेवी यांनी त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून ती प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 1989 मध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. श्रीदेवीला लेडी अमिताभ बच्चन म्हटलं जायचं. चांगलं कामाबद्दलची त्यांची धडपड असायची. ते एवढं डेडीकेटेडली काम करायच्या की त्यांनी चक्क एका चित्रपटात भर तापातही आपलं शुटींग पूर्ण केलं होतं.

हा चित्रपट होता ‘चालबाज’.श्रीदेवी यांनी 1989 मध्ये ‘चालबाज’ चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. हा चित्रपट 1989 सालचा मोठा हिट ठरला. या चित्रपटात श्रीदेवीशिवाय रजनीकांतसारखे सुपरस्टारही दिसले होते. या चित्रपटात रजनीकांत आणि सनी देओलची नायिका बनून श्रीदेवी यांनी लोकांची मने जिंकली होती.

या चित्रपटातील गाणीही खूप गाजली.पण या चित्रपटातील ‘किसी के हाथ ना आएगी ये लडकी’ हे गाणं लोकांना खूप आवडलं. या गाण्यात श्रीदेवी यांचा लूक आणि अवखळपणा सर्वांनाच भावला. आजही हे गाणं तेवढच पसंत केलं जातं. मात्र त्यावेळी त्यांना 103 अंश ताप होता. पण प्रचंड तापातही त्यांनी पावसातील या गाण्याचं शूट पूर्ण केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला.