बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियांका चोप्रा कधी आपल्या अभिनयाने तर कधी वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असते ‘देसी गर्ल’ प्रियांकाने आता आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता अभिनेत्रीने घोषणा आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली असून तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत. प्रियांकाचा आगामी सिनेमा हा बॉलिवूडट नसून हॉलिवूडपट आहे.
प्रियांका चोप्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत तिने लिहिलं आहे,”मला आशा होती की जर मी जिवंत राहिले आणि देवाची इच्छा असेल तर आपल्याला देखील समुद्री डाकू बनण्याची संधी मिळेल”.
‘द ब्लफ’चं कथानक 19 व्या शतकातील कॅरेबियन फेजवर आधारित आहे. एका माजी महिला समुद्री डाकूची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. कुटुंबियांची रक्षा करण्यासाठी धडपडणारं प्रियांकाचं पात्र आहे. अत्यंत रहस्यमय असा हा सिनेमा आहे. फ्रँक ई फ्लावर्स या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. फ्रँक ई ‘Bob : Marley: One Love’ या सिनेमामुळे चर्चेत आला होता. या सुपरहिट सिनेमाचं त्याने लेखन केलं होतं.