कामेरीच्या ग्रामसभेत ५० टक्के पाणीपट्टी आकारण्याचा एकमताने ठराव मंजूर

 सद्या प्रत्येक भागात वसुली मोहीम सुरु केलेली आहे. पाणीपट्टी, घरफाळा वसुली बाबतीत काटेकोरपणे वसुली मोहीम चालू असून पाणीपट्टी घरफाळा भरून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जितके पाणी तितकीच पाणीपट्टी, या धोरणानुसार वर्ष २०२४-२५ पासून ५० टक्के पाणीपट्टी आकारावी, असा ठराव वाळवा तालुक्यातील कामेरी ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य शुभम पाटील यांनी मांडला. त्याला विक्रम पाटील व विलास पाटील यांनी अनुमोदन दिले. कामेरीतील पिण्याच्या पाणीपुरवठा एक दिवस आड होतो, तो दररोज सुरू करावा यासाठी ग्रामपंचायतला पन्नास दिवसांची मुदत दिली आहे.

तसेच पाणीपट्टी व घरपट्टी थकीत असणाऱ्या ग्रामस्थांचे दाखले दिले जात नाहीत. त्यांना दाखले द्यावेत असे ठराव मंजूर केले. सभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच नंदूकाका पाटील होते. यावेळी शुभम पाटील यांनी पुरेसे पाणी मिळत नसेल तर पाणीपट्टी व घरपट्टी ५० टक्के आकारावी, दाखले देऊन सहकार्य करावे, अशी मागणी केली.

कामेरीत ५० टक्के घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर झाला आहे. पाणी वितरण व्यवस्था ठरलेल्या वेळीच व्हावी. यासाठीही प्रशासनाला ५० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा वरील ठराव अंमलात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य शुभम पाटील यांनी सांगितले