सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) तीव्र नाराजीची लाट उसळली . त्यातच आता सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर सांगली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबत काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आज विशाल पाटील सांगलीत मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे.
महाविकास आघाडीत ठाकरे गट (Shiv Sena UBT) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सांगली मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस नेते नागपूरकडे (Nagpur) रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला. मोजक्या कार्यकर्त्यांसह विशाल पाटलांनी उमेदवारी दाखल केली .
काँग्रेस नेते नागपूरकडे रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठत उमेदवारी दाखल केली. तर आज काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दाखल केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. असे झाले तर महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करत दुसरा अर्ज दाखल करणा आहेत.