लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहे. प्रयेक पक्षाची मोर्चेबांधणी सुरु आहे. सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने (Rashtriya Samaj Paksha) देखील आता उडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची (lok Sabha Election) निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे (Kalidas Gadve) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
स्वबळावर निवडणूक लढवण्याची निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. राज्यात सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जातेय. आता महायुतीमधील वाद समोर आला आहे. महादेव जाणकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आले आहे.
कारण, राष्ट्रीय समाज पक्षाने सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. त्याशिवाय लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारीही सुरु केली आहे. महादेव जाणकर हे महायुतीमधील महत्वाचे घटक मानले जात होते, त्यांच्या बाहेर जाण्याने एनडीएच्या मतांवर फक पडू शकतो. महादेव जाणकर यांच्यामागे धनगर समाजाची मतांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. खासकरुन पश्चिम महाराष्ट्र मधील मतांवर फरेक पडेल, असा अंदाज आहे.