स्व. आ. अनिलभाऊ बाबर हे जिल्हा नियोजन बैठकीत मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत होते. त्यानुसार मंजूरी सुध्दा मिळत होती. त्यांच पध्दतीने आ. सुहास बाबर यांनी पाहिलीच जिल्हा बैठक भाऊंचा आदर्श ठेवून मतदार संघातील प्रश्न मांडण्याचा अनुभव यावेळी आला. स्व. अनिलभाऊ ज्या तडफडीने प्रश्न मांडत व त्याचा पाठपुरावा करीत त्याच पद्धतीने आ. सुहास बाबर यांनी मतदारसंघातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. स्व. अनिलभाऊंच्या प्रमाणे आ. सुहास बाबर यांची तळमळ दिसत आहे.
खानापूर आटपाडी मतदार संघातील विविध प्रश्न आमदार सुहास बाबर यांनी सांगली जिल्हा नियोजन समिती बैठकीत मांडले. आ. बावर आमदार झाल्यानंतर पहिलीच मिटींग मध्ये मतदारसंघात विकास कामाबद्दल आपला दृष्टीकोन दाखवून दिला. अतिशय अभ्यासपूर्ण आणि विकासत्मक दृष्टीकोन ठेवून आपल्या मागण्या मंजून करून घेतल्या. अनेक महत्वाचे लोकप्रश्न उपसिस्थित केले व मतदार संघासाठी विशेष अतिरिक्त निधी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हयात वाढलेल्या अंमली पदार्थ माफिया विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. वनविभागकडे पाणी योजना, टेंभू योजना व इतर विभागाचे रखडलेल्या प्रस्तावबाबत चर्चा करण्यात आली.
सन २०२५- २६ चा जिल्हा वार्षिक योजना आराखडा वाढीव तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. शेटफळे व हिवतड ता. आटपाडी येथील म हावितरण कंपनीच्या सवस्टेशनचे काम लवकर पूर्ण करण्याचे मागणी यावेळी केली. जिल्हा वार्षिक योजनेतून महावितरणच्या कामासाठी अर्थात अतिरिक्त रोहित करणे, लाईन शिफ्टिंग करणे कामासाठी जादा निधी मिळवा. माहुली व भाळवणी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र करण्यास मंजूरी देण्यात आली. या मागण्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत आ. सुहास बाबर यांनी केल्या आहेत.