आटपाडी बस स्थानकातून अकलूजमार्गे बारामती बससेवा दोन- तीन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अकलूज आणि बारामतीला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आटपाडी- बारामती बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे. कोरोना कालावधीत बंद झालेली सेवा नंतर रस्त्याच्या कामामुळे सुरूच झालेली नाही. अनेकदा मागणी करूनही सेवा पुन्हा सुरू झालेली नाही. आटपाडी तालुक्यातील प्रवाशांना अकलूज किंवा बारामतीला जाण्यासाठी कोणतीच थेट बस नाही.
आटपाडी ते महूद आणि महूद ते अकलूज- बारामती अशा बसेस बदलून प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आप आटपाडी आगाराने तत्काळ ही बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.