सध्या मकर संक्रांति निमित्त अनेक ठिकाणी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात येत आहेत. अनेक विविध कार्यक्रम देखील यावेळी महिलांसाठी घेतले जातात. या कार्यक्रमांना महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद देखील पहायला मिळतो. समर्पण फौंडेशन व विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी साळशिंगे रोड येथील शेतकरी बचत भवनमध्ये हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती समर्पण फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. शीतल अमोल बाबर यांनी दिली. समर्पण फौंडेशन आणि विट्याचा राजा गणेश मंडळाच्या वतीने नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. मकर संक्रांतनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांसाठी मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ विटा परिसरातील महिलांनी घ्यावा असे आवाहन डॉ. सौ. शीतल बाबर यांनी केले आहे.
विट्यात उद्या हळदी-कुंकू समारंभ….
