किरकोळ कारणातून बामणीत दोन गटात हाणामारी, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

अलीकडे अनेक छोट्या मोठ्या कारणाने हाणामारी, खून यामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येक भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. खानापूर तालुक्यातील बामणी येथे दोन गटात हाणामारी झाली. शेतात जाण्यावरून विळा, काठी व खोऱ्याचा वापर करून एकमेकांना मारहाण झाल्याची फिर्याद विटा पोलिसात देण्यात आली आहे. यामध्ये पाच जणांवर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सचिन नामदेव गवळी व त्याची आई कांचन गवळी ऊसातील पाला गोळा करीत असताना गणेश रामचंद्र गवळी यांनी त्यांचे शेतात येवुन माझ्या शेतातून ऊसाचे ट्रक्टर का घेवुन गेला असे म्हणुन आईला शिवीगाळ दमदाटी केली.

याचवेळी रामचंद्र महादेव गवळी याने हातात विळा आणि महेश गवळी याने हातात काठी घेऊन सचिन यास मारहाण करू लागले. रामचंद्र गवळी याने पाठीमागुन पकडले व महेश गवळी याने त्याच्या हातातील काठीने डोकीत, पाठीवर मारहाण केली. त्यावेळी आई सोडविण्यासठी मध्ये आली असता तिलाही महेश गवळी याने काठीने मारहाण केली. त्यानंतर पुन्हा गणेश याने महेश याचे हातातील काठी घेवुन सचिन यास मारहाण केली. त्यावेळी शेजारील शेतक-यांनी भांडणे सोडविल्यानंतरही महेश गवळी हा दगड घेवुन सचिनच्या अंगावर धावुन येवून शिवीगाळ करून तुला पुरुन टाकतो अशी धमकी देवुन तो तेथून निघून गेला. तर दुसरीकडे महेश रामचंद्र गवळी यांनीही उसाचे पाला ओढनेच्या खोऱ्याने सचिन नामदेव गवळी व कांचन नामदेव गवळी यांनी मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे.

सचिन गवळी यास तु आमचे शेतातून न विचारता रस्ता करून ऊस का नेलास असे विचारले असता त्याने हाताने व लाथाबुक्यानी मारहाण केली. त्यावेळी महेश याने सचिन गवळी यास तु माझा भाऊ गणेश यास शिवीगाळी करून मारहाण का केलीस असे विचारत असताना सचिन याने ऊसाचा पाला ओढण्याचे दांताचे खोरेने उजव्या दंडावर मारून महेशला जखमी केले आहे. तसेच दोघांनी संगनमत करून महेश व त्याचा भाऊ गणेश यास शिवीगाळी करून जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिली आहे. यात परस्परविरोधी दोन्ही गटांकडून विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे करीत आहेत.