नेलकरंजी तालुका आटपाडी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेलकरंजी ( ता. आटपाडी) शाखेत शाखाधिकारी व कनिष्ठ लिपिकाने ४८ लाख रुपयांचा
अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संबंधित शाखाधिकारी मच्छिंद्र म्हारगुडे व कनिष्ठ लिपिक प्रताप पवार यांना निलंबित केले आहे. या दोघांची बँकेच्या तपास अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरू आहे. या दोघांवर बुधवारी फौजदारी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या नेलकरंजी शाखेतील हा घोटाळा वास्तविक ५८ लाख रुपयांचा आहे. मात्र यातील दहा लाख रुपये संबंधित कर्मचाऱ्यांनी खातेदारांच्या नावावर वर्ग केले; पण बोगस एटीएमद्वारे ही रक्कम त्यांनी काढण्याच्या आधीच हा अपहार उघडकीस आला. त्यामुळे हे दहा लाख रुपये खात्यावर तसेच आहेत. उर्वरित ४८ लाख रुपये मात्र संबंधितांनी हडप केले.