सध्या अनेक भागात गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. अवैध धंदे राजेरोसपणे सुरु आहेत. याला तरुणाई बळी पडत आहे. अलीकडेच विट्यातील ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्याने तर भीतीचे वातावरणच पसरले आहे. या पार्श्ववभूमीवर ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे.
विटा शहरातील आणि खानापूर तालुक्यातील सर्व हायस्कूल, शाळा, ज्युनिअर कॉलेज, सिनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्ज आणि नशिले पदार्थाच्याबाबतीत जागृती येण्यासाठी भावी पिढी व्यसनापासून अलिप्त राहण्यासाठी जनजागृती करण्यासाठी एक अभियान हातात घेत आहोत. या अभियानाच्या माध्यमातून विटा शहरासह खानापूर तालुक्यातील प्रत्येक शाळेमध्ये जाऊन जनजागृती अभियान राबविणार असल्याचे अॅड. वैभव पाटील यांनी सांगितले.