खानापूर येथे नागरिकांकडून हिंदवी स्वराज्य स्तंभ उभा करण्याची मागणी

खानापूर हे गाव इतिहासकालीन भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे . त्यामुळे गावाला शोभेल असा असा भव्य उंचीचा दीपस्तंभ उभा करावा अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान व खानापूर येथील नागरिक व तरुणांनी केली आहे. त्यासाठी तरुण, नागरिकांनी गावातून फेरी काढून नगरपंचायत कार्यालय खानापूर येथे जाऊन लेखी निवेदन दिले.

अधिकारी नार्वेकर साहेब व नगराध्यक्ष सौ सुमनताई लालासो पाटील यांना दीपस्तंभ उभारण्यासाठी श्री राहुल रमेश टिंगरे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खानापूर तालुका विभाग प्रमुख व वैभव तानाजी हडदरे याना हे लेखी निवेदन शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान गावप्रमुख व खानापूर येथील असंख्य नागरिकांच्या हस्ते देण्यात आले.