सुतगिरण्यांची उत्पादन क्षमता वाढणार : अशोक स्वामी

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात कारखानदार यांची संख्या खूपच आहे. परगावचे लोक कामानिमित्त इचलकरंजीत वास्तव्यास आलेले आहेत. १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. भारत सरकारने ३२ मिलिमीटर पेक्षा अधिक लांबीचा कापूस पिकवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे या अर्थसंकल्पात निश्चित केले आहे. त्यामुळे लांब धाग्याच्या कापसामुळे सुतगिरण्यांच्या मध्ये तयार होणारी सुताचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. सुताचा दर्जा सुधारल्यास उत्पादन क्षमता वाढणार आहे. त्यामुळे सुत व कापड निर्यातीस प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर व्यक्त केली.