सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. रस्ते, वाहतूक, पाणी याचबरोबर अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या सांगोला तालुक्यात देखील अनेक समस्या पहायला मिळत आहेत.
सांगोला एस.टी. बसस्थानकामध्ये प्रवेशद्वार असलेल्या समोर नवीन रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण काम सद्या सुरू आहे. सदरचे काम करताना ठेकेदाराने मंजूर निविदा व शासकीय नियमाप्रमाणे केले आहे का नाही ? याची चौकशी करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून केले जात आहे.
तरी वरिष्ठ अधिकाऱ्याने लवकरात लवकर सदर कामाची चौकशी करावी. तसेच कामात हलगर्जीपणा केला असल्यास व कामाची गुणवत्ता शासकीय नियमाप्रमाणे न नसल्यास संबंधित ठेकेदार याच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केले जात आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.