श्रीराम तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ६४ वर्षांची परंपरा जपली

गुजरात निधी , किल्लारी भूकंप , पूर परस्थिती , कोविड कालावधी या सर्व उपक्रमात सहभागी होत मागील ६४ वर्षांची परंपरा असणाऱ्या शिवाजी चौकातील श्रीराम तरुण मंडळाने ‘ महाराष्ट्र दर्शन ‘ हा सजीव देखावा केला आहे. या देखाव्यास सांगोलाकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला असून मंडळाच्या ४० सदस्यांनी बसविलेला सजीव देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

चालूवर्षी मंडळाने मराठा आंदोलकांना अल्पोहार , वृक्ष लागवड , रक्तदान शिबीर , रांगोळी स्पर्धा , अथर्वशीर्ष पठण, रंगभरण स्पर्धा व ४० सभासदांच्या सहभागाने महाराष्ट्राची संस्कृती , परंपरा , लोककला , उत्सव , वेशभूषा , कृषी आणि ऐतिहासिक वारसा याचे मनोहर चित्रण सादर केले आहे. सादर केलेला महाराष्ट्र दर्शन हा देखावा चालू केलेला आहे. यासाठी सांगोला शहरातून व तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून शनिवार , दि. ६ सप्टेंबर रोजी पारंपरिक वाद्यांसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत श्री गणेशाची मिरवणूक निघणार असल्याचे आयोजकांनी सांगितले