आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विविध स्पर्धेचे आज बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन

सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवी यात्रा निमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सदर विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रम आज शुक्रवार दिनांक ७ रोजी सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.सांगोल्याचे ग्रामदैवत ‘अंबिका देवी’ यात्रेनिमित्त आयोजित केलेले शेती प्रदर्शन व विविध स्पर्धा यांचा भव्य बक्षीस वितरण समारंभ सांगोल्याचे लोकप्रिय दमदार आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.

तसेच बक्षीस वितरणानंतर नयनरम्य शोभेचे दारू काम होईल व त्यानंतर यात्रेची सांगता होणार असल्याचे कोर्ट रिसिव्हर्स श्री अंबिका देवी यात्रा व प्रदर्शन समिती सांगोला यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. बक्षीस वितरणानंतर नयनरम्य शोभेचे दारू काम होईल व त्यानंतर यात्रेची सांगता होईल