मंगळवेढ्यात अवकाळीची व चारा टंचाईची भीती

हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्याने व भविष्यातील चारा टंचाईच्या भीती पोटी ज्वारीच्या कडब्याची साठवणूक प्रक्रिया जोरात सुरू आहे.कडब्याची जुळवाजुळव केली जात आहे.पावसात भिजू नये म्हणून कडब्याच्या बलमी लावल्या जात आहेत.त्यासाठी विशेष मजुरांना मागेल तेवढी मजुरी देऊन कामावर लावले जात आहे.

राज्यात अवकाळीची परिस्थिती आहे.त्यामुळे कडबा भिजून खराब होईल या भीतीने शेतकरी बलमी रचून घेत आहेत.एका बलमीत 1 हजार ते दीड हजार पर्यंत कडबा रचला जातो. त्यामुळे राणात पडलेला कडबा गोळा करून बलीम रचण्याची लगबग मंगळवेढ्यात सुरू आहे.

गेल्या मोसमात पावसाअभावी ज्वारीचा कडबा कमी आला.त्यातच सांगली पुणे कोल्हापूर चे व्यापाऱ्यांना मंगळवेढ्यातील कडब्याची चढ्या दराने विक्री सुरु आहे.त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमुळे येणारे कांही महिने जिकिरीचे जाणार आहेत.हे लक्षात घेवुन शेतकरी मिळेल त्या दराने कडबा विकत घेऊन बलमी लावत आहेत. व भविष्यातील चारा टंचाई दूर करत आहेत.