व्हॅलेंटाईन डेच्या आधी टायगर श्रॉफने व्यक्त केलं अनोखं प्रेम…..

टायगर श्रॉफ हा एक फिटनेस स्टार आहे, जो तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहतो आहे. दिशा पटानीसोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत असतात.दरम्यान टायगरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीला दिलेल्या कॅप्शनमध्ये “फक्त कारण मी तुझ्यावर प्रेम करतो….” त्याने असं लिहिल्याने तर हा व्हिडीओ अधिकच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये टायगर त्याच्या ट्रेनरसोबत स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, टायगरने जीन्ससह स्लीव्हलेस हूडी घातली आहे.

तसेत त्यांने त्याचा चेहराही कव्हर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याचा ट्रेनर सिगारेट ओढताना दिसत आहे आणि समोरून टायगर येतो आणि तो पायाने स्टंट करत ती सिगारेट खाली पाडतो.  हाताने नाही म्हणत ही सवय चांगली नसल्याचा इशारा देतो. एकंदरीतच टायगरने सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानिकारक असून ती न ओढण्याचा आणि आपलं आरोग्य फिट ठेवण्याचा संदेश दिला आहे.या व्हिडिओला टायगरने सलमान खान आणि करीना कपूर स्टारर ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील ‘आय लव्ह यू’ हे गाणे जोडले आहे.

तसेच “फक्त याच कारण मी तुझ्यावर प्रेम करतो नदीम’ असं त्याने कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.टायगर लवकरच अ‍ॅक्शनने भरलेल्या ‘बागी 4’ च्या फ्रँचायझीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ए. हर्ष दिग्दर्शित ‘बागी 4’ यावर्षी 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.