आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन काळूबाळूवाडीचा टेंभू योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्धीस आहे. कारण या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पण अलीकडच्या काळात या भागातील पाण्याची टंचाई काही अंशी कमी होऊ लागली आहे. सांगोला तालुक्यातील काळूबाळूवाडी (जुनोनी) टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या राज्य सरकार व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पुढाकार घेऊन टेंभू योजनेमध्ये समावेश करावा अशी मागणी जुनोनी गावचे ग्रामपंचायत सदस्य अमृत दादा पाटील युवक नेते महेश भाऊ ठोंबरे यांनी केली आहे. यावेळी बोलताना युवक नेते महेश ठोंबरे म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या हा दिवस डोंगर भागात काळूबाळवाडी गावातून या गावाची लोकसंख्या २००० च्या आसपास आहे.

महसुली वेगळ गाव असून या भागातील टेंभू योजनेत समावेश नसल्याने शेतकरी वर्गाची मोठी अडचण झाली आहे टेंभू योजनेत समावेश करून या भागातील बंदिस्त पाईपलांद्वारे सांगोलकर तलाव भरावा त्याद्वारे जवळपास नऊ बंधारे भरले जातील याचा परिणाम काळुबाळूवाडी भागात पाणी मिळणार आहे. संबंधित शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर निर्णय करून टेंभू योजनेचे पाणी सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. 

सोलापूर कोल्हापूर हायवे वरून जवळ्याकडे टेंभू योजनेचा मुख्य कॅनॉल जात असून शेतकऱ्यांना त्याचा कोणताही फायदा होत नसल्याचे तेथील नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मुख्य कॅनॉल हा उतारावरून गेला आहे आणि लाभ क्षेत्रातील शेती चढावर असल्याने योजनेचा कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आले. काळूबाळूवाडीचा राज्य सरकारने टेंभु योजनेत समावेश करून तात्काळ पाणी सोडावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवक नेते महेश ठोंबरे यांनी दिला आहे.