आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या चित्रपटांप्रमाणे तिचं वैयक्तिक आयुष्यही कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं.आता पुन्हा एकदा रिंकू चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. यावेळेस कारण तिच्या लग्नाचं आहे. रिंकूचं लग्न ठरतंय का असा प्रश्न सध्या चाहते विचारताना दिसतात. त्याचं कारण म्हणजे तिचा आणि कोल्हापूरच्या बड्या नेत्याच्या मुलाचा व्हायरल होणारा फोटो. सैराट चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या फोटोत ती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धाकटे चिरंजीव युट्युबर आणि उद्योजक कृष्णराज महाडिक याच्यासोबत दिसतेय. कृष्णराज युट्युबवर क्रिश महाडिक म्हणून लोकप्रिय आहे. कधी गावचा रस्ता दुरुस्त कर, तर कधी चक्क गावात घरोघरी जाऊन कचरा गोळा करणारे कृष्णराज यांचे फॉलोवर्स कोटींमध्ये आहेत. युट्यूबवरील त्याच्या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळते. त्याच्या व्हिडीओवर अनेकदा कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या कृष्णराजने आपल्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेला फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमुळे कृष्णराज आणि रिंकूच्या लग्नाच्या चर्चांनीदेखील जोर धरला आहे.
कृष्णराजने इंस्टाग्रामवर रिंकूसोबतचा फोटो शेअर ‘आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतलं.’ हा फोटो काही मिनिटातच व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करण्यात आला.
रिंकू राजगुरू रविवारी ९ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या ‘राजर्षी शाहू महोत्सवात’ हजेरी लावताना दिसली. योगायोगाने कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनावेळी या दोघांची भेट घडून आली. कृष्णा महाडिक यांनी रिंकूसोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर करताच या चर्चेला आता उधाण आलं आहे. पण या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचं बोललं जात आहे. केवळ एकत्र फोटोमुळे ही लग्नाची चर्चा रंगवली जात आहे.