हुपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हुपरीत चित्रकला स्पर्धेचे आयोजन

प्रत्येक भागात अनेक विविध कार्यक्रमानिमित्त सामाजिक, मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते. याला उत्स्फूर्त सहभाग देखील पहायला मिळतो. हुपरी येथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. हुपरी येथील वंचित बहुजन आघाडी हुपरी शहर यांच्यातर्फे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. १६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर हुपरी या ठिकाणी सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मोठा गट ( इयत्ता आठवी ते नववी) साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग, कोणत्याही एका किल्ल्याचे चित्र, मैदानी खेळ, कोणतीही एक वस्तू चित्र, असे विषय असणार आहेत.

या स्पर्धेसाठी अनुक्रमे ७०१, ५०१, ३०१ असे रोख पारितोषिक असणार आहेत. लहान गट इयत्ता पाचवी ते सातवीसाठी निसर्ग चित्र, वस्तू चित्र, झाडे लावा झाडे जगवा, विषय असणार आहेत. यासाठी अनुक्रमे ५०१, ३०१ व २०१ रुपये अशी बक्षिसे असणार आहेत. तरी सर्व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बहुजन वंचित आघाडीचे हुपरी शहर अध्यक्ष पांडुरंग माणकापूरे केले आहे.