धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा आयोजित करण्यात आलेली होती. ही निवडणूक उमेदवारांचे नाही तर देशाचे भवितव्य निर्माण करणारी आहे. जनतेच्या भवितव्याचा आणि भविष्याचा निर्णय करणारी आहे. साठ वर्षांत काँग्रेसने केले नाही तेवढे काम दहा वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. बैलजोडा,गाय वासरू व पंजाला मतदान देऊन बघितले आहे. मात्र भारतीय जनता पार्टी मजबूत आहे. धैर्यशील माने यांना निवडून द्या, हुपरी शहरासाठी चांदीच्या वस्तूंचे डिझाईन सेंटर उभे करु असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
हुपरीसाठी चांदीच्या वस्तूंचे डिझाईन सेंटर उभे करणार ना. गडकरींचे आश्वासन
