आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन! एक हजार बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प….

प्रत्येक भागात अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. बरेचजण वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात. तसेच अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. आमदार जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दि. १४ फेब्रुवारी पासून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, घरोघरी खाऊ वाटप, महारक्तदान शिबिर आयोजित केल्याची माहिती शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी दिली.

माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे, माजी नगरसेवक खंडेराव जाधव, युवा नेते संदीप पाटील, युवक राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सचिन कोळी, जय महाराष्ट्र सूतगिरणीचे अध्यक्ष संजय जाधव, परेश पाटील, राजू बाणेकर, सूर्याजी पाटील, अभिजित पाटील, शकील जमादार, धनंजय पाटील, सूरज कचरे, कुणाल कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.

शहाजी पाटील म्हणाले, शुक्रवार दि. १४ ते २० फेब्रुवारी दरम्यान इस्लामपूर येथील पोलीस परेड ग्राउंडवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत शहरातील ६३ बूथमधील ६३ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम २५ हजार, द्वितीय- १५ हजार, तृतीय- १० हजार, चतुर्थ-७ हजार व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. स्पर्धे तील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना व्यक्तिगत आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

रविवार दि.१६ रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत इस्लामपूर शहरातील घरोघरी बुंदी वाटप केली जाणार आहे. रविवारीच शहरातील महिलांच्या रांगोळी स्पर्धा होणार आहेत. यातील विजेत्या महिलांना प्रभागवार रोख बक्षीस, सहभागी महिलांना भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता कापुसखेड नाका येथील श्रीम ती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्र (ओपीडी) येथे महारक्तदान शिबीर आयोजित केले आहे. शिबिरात इस्लामपूर शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. साधारण १ हजार बाटल्या रक्तसंकलन केले जाणार आहे.