हातकणंगले तालुक्यातील हुपरी हे शहर कायमच नावारूपास आहे. तसेच या शहराला चांदीच्या दागिन्यामुळे खूपच प्रसिद्धी आहे. भाजपा युवा नेते अमित गाट यांच्या पाठपुराव्यामुळे नगर परिषदेच्या प्रथम नगराध्यक्ष जयश्री गाट यांच्या अथक प्रयत्नामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेअंतर्गत 46 कोटी 50 लाख रुपयांच्या प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे.
त्यामुळे हुपरी शहरातील अनेक माता भगिनींचे पाण्याचे स्वप्न कायमस्वरूपी पूर्णत्वास आलेले आहे. पाणी प्रश्न कायमचा मिटल्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या योजनेसाठी मंजुरी मिळावी यासाठी दीड वर्षापासून प्रयत्न चालू आहेत अखेरीस या योजनेला मंजुरी मिळालेली आहे.