सध्या इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे म्हणजेच रस्ते, वाहतूक याबाबतीत समस्या सोडविल्या जात आहेत. जनतेला येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. अनेक भागातील रस्ते दुरुस्ती देखील होऊ लागली आहे तसेच अतिक्रमणे देखील हटविण्यात येत आहेत. पण अलीकडे शहरात मुख्य रस्त्यावर असलेल्या मद्य विक्री केंद्रांसमोर सायंकाळपासून मोठी गर्दी होते.
मद्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांची वाहने अस्ताव्यस्तपणे लावली जातात. या प्रकारातून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. प्रसंगी वादावादीचे प्रकारही घडत आहेत. तरी शासनास सर्वाधिक महसुल मिळवून देणाऱ्या या मद्य विक्री केंद्रांसमोर वाहतूक पोलीस नेमून होणारी वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी अन्य वाहनधारकांतून होत आहे. आता पहावे लागेल वाहतूक निरिक्षक कोणता निर्णय घेतात.